MVA Leaders on Vishal Patil : विशाल पाटलांकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल; मविआ नेत्यांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
16 Apr 2024 11:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMVA Leaders on Vishal Patil : विशाल पाटलांकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल; मविआ नेत्यांची प्रतिक्रिया सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी सांगलीत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली . त्यातच आता सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी अखेर सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्याचबरोबत काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केलाय.. त्यामुळे महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज विशाल पाटील सांगलीत मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे...