MVA Government : मविआ काळात फडणवीस, शिंदेंना अटक करण्याच्या कटाचा तपास SIT मार्फत

Continues below advertisement

MVA Government : मविआ काळात फडणवीस, शिंदेंना अटक करण्याच्या कटाचा तपास SIT मार्फत 

हेही वाचा : 

भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या ओडीओ क्लिपवरून एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी चौकशीची मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करून अडचणीत आणण्याचा डाव होता. देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेची ओडीओ क्लिप सभागृहात सादर करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी चौकशीची मागणी केली त्याचबरोबर तत्कालीन डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांचे निलंबन करावे अशी मागणी केली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

यावेळी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, एक स्टींग ऑपरेशन समोर आलं. तत्कालीन सरकारच्या आदेशानुसार तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करण्याचे षडयंत्र बाहेर आले.आज ते सरकारच्या निदर्शनास आणून दिले. जो जबाब यामध्ये समोर आला, तो फडणवीस व शिंदे यांना अडकवा. डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना ती जबाबदारी दिली होती. संजय पुनामिया यांचा जबाब वाचून दाखवतो. सदर आरोपीने एसीपी सरदार पाटील यांना विचारणा केली. तुम्ही टार्गेट नव्हता. तर, शिंदे व फडणवीस हे टार्गेट होते. हे व्हिडिओ समोर आले आहेत. सूड भावनेने सरकारने वागू नये असं सांगताना महाविकास आघाडी सरकारमध्ये शिंदे यांचे वर्चस्व वाढत होते म्हणून सूड बुद्धीने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram