ABP News

MVA Full PC on Malvan Statue Collapse : महायुतीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला ; मविआची संपूर्ण PC

Continues below advertisement

मुंबई :  महाराष्ट्रमध्ये अस्वस्थता आहे.  महिलांवार अत्याचार वाढत आहे. आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते घडलं महाराजांचा पुतळा कोसळला.  भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे.  जोरदार वाऱ्याने  राज्यापालांची टोपी कधी उडाली नाही.  महाराजांच्या पुतळ्याचं पुन्हा टेंडर काढून घोटाळा करणार, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष  उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला आहे. ते मुंबईत महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi)  पत्रकार परिषदेत बोलत होते.  या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होतेय  

 कोकणवासियांना आता कळलं असेल .  स्मारकारच्या कामात सुद्धा मोठा भ्रष्टाचार झालाय. पुतळा उभरण्याचे टेंडर काढून पुन्हा घोटाळा करणार आहे.    जे मालवणला रस्ता आडवून बसले ते शिवद्रोही होते. शिवद्रोही आडवे आलेत. हे इतके मस्तवाल झाले की कोणतीही भीडभाड न बाळगत नाही त्यांचे पाठीराखे दिल्लीत बसले आहे.  किल्ल्यावर रस्ता अडवणारे मोदी, शाहांचे दलाल आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram