MVA Disputes : जागावाटपारवरून पटोले आणि ठाकरे गटात वाद

Continues below advertisement

MVA Disputes : जागावाटपारवरून पटोले आणि ठाकरे गटात वाद

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या तीन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या काही दिवस आधीच मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यानुसार बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तीन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र, तरीही हल्लेखोरांनी डाव साधत बाबा सिद्दीकी यांची हत्या केली. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार होत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस ( Mumbai Police)सुरक्षारक्षक कुठे होते, हा प्रश्न उपस्थित झाला होता. याबद्दल आता नवीन माहिती समोर आहे. 

मुंबई पोलिसांकडून नुकताच बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला. बाब सिद्दीकी यांना 2+1 अशाप्रकारची सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यानुसार दिवसा बाबा सिद्दीकी यांच्यासोबत 2 आणि रात्री एक सुरक्षारक्षक तैनात असायचा. बाबा सिद्दीकी हे खेरवाडी जंक्शनजवळ झिशान यांच्या कार्यालयात असताना त्यांच्यासोबत दोन पोलीस सुरक्षारक्षक होते. यापैकी एक पोलीस सुरक्षारक्षक रात्री साडेआठ वाजता  ड्युटी संपल्याने निघून गेला.

बाबा सिद्दीकी झिशान यांच्या कार्यालयातून बाहेर  पडले तेव्हा त्यांच्यावर मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या. यावेळी बाबा सिद्दीकी यांच्यासोबत केवळ एकच पोलीस कर्मचारी होता. मारेकऱ्यांपैकी शिवकुमार याने बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. तर दुसरा हल्लेखोर धर्मराज कश्यप याने त्याचवेळी मिरचीचा स्प्रे हवेत फवारला. हा स्प्रे आपल्या डोळ्यात गेल्याने आपण उलटा गोळीबार करुन प्रत्युत्तर देऊ शकलो नाही, असा जबाब संबंधित पोलीस सुरक्षारक्षकाने दिला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram