Maharashtra Politics: निवडणुकीतील घोळावर विरोधक एकवटले, निवडणूक आयोगाला जाब विचारणार
Continues below advertisement
महाविकास आघाडीचे (MVA) आणि मनसेचे (MNS) प्रमुख नेते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी राज्य निवडणूक आयोगाची (State Election Commission) भेट घेत आहेत. या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. 'आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पारदर्शकपणे व्हाव्यात आणि ज्या शंका उपस्थित केल्या जात आहेत त्याचं निरसन राज्य निवडणूक आयोगाने करावं,' अशी स्पष्ट मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर मतदार याद्यांमधील घोळ, एकाच पत्त्यावर अनेक नावांची नोंद आणि निकालातील त्रुटींसारख्या गंभीर विषयांवर हे नेते मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम (S. Chockalingam) यांच्याशी चर्चा करणार आहेत. याआधी सादर केलेल्या पुराव्यांवर आयोगानं काय कारवाई केली, याचा जाबही या भेटीदरम्यान विचारला जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मात्र दिल्लीतील बैठकीमुळे या शिष्टमंडळात सहभागी झालेले नाहीत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement