Vote Theft Row: 'वोट चोरी, गद्दी छोडो'चा नारा देत मुंबईत सर्वपक्षीय महामोर्चा, Arvind Sawant आक्रमक

Continues below advertisement
मुंबईत 'वोट चोरी' आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीसह (MVA) सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. खासदार अरविंद सावंत, जितेंद्र आव्हाड, सचिन सावंत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मोर्चाची माहिती दिली. 'लोकसभेत आम्ही 'वोट चोरी, गद्दी छोडो'चा नारा दिला होता, तोच नारा घेऊन आता आम्ही मुंबईच्या रस्त्यावर उतरत आहोत,' असं खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं. हा मोर्चा मेट्रो सिनेमाजवळून सुरू होऊन मुंबई महापालिका मुख्यालयासमोर संपणार आहे. मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी मोर्चा दुपारी २.३० च्या सुमारास सुरू होऊन ४ वाजेच्या आत संपवण्यात येणार असल्याचेही नेत्यांनी सांगितले. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (UBT), मनसे आणि कम्युनिस्ट पक्षासह अनेक पक्ष सहभागी होणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola