मुस्लीम समाजाच्या रॅलीला हिंसक वळण,अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये दगडफेक, नांदेडमध्ये 2 पोलीस जखमी

Continues below advertisement

मुंबई : त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी अनेक दुकानांची तोडफोड केली तर अनेक दुकानं जबरदस्तीनं बंद करण्यात आली. नांदेड शहरात देखील याचे पडसाद उमटले. शहरातल्या शिवाजीनगर, केळी मार्केट, देगलूर नाका परिसरात तुफान दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. व्यावसायिकांच दुकानं आणि खासगी वाहनांसह पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळं दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. दगडफेक करतानाची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram