Pune : Manchar मध्ये Love Jihad चा प्रकार? आरोपी मुलावर लैगिंक शोषणाचा गुन्हा दाखल ABP Majha

Continues below advertisement

पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरात लव्ह जिहादची घटना घडल्याचा आरोप होतोय. चार वर्षांपूर्वी  अल्पवयीन मुलीला मुस्लीम मुलाने फूस लावून पळवून नेल्याचा दावा केला जातोय. काही दिवसांपूर्वी हे दोघे मंचरमध्ये परतल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केलेत. चार वर्षांत पीडितेला मुलाच्या कुटुंबीयांना बुरखा घालण्यास भाग पाडले, गोमांस खाऊ घातले, नमाज पढण्याची सक्ती केली, तिला सिगारेटचे चटके दिले, असे आरोप पडळकरांनी केलेत. 22 मे 2019 रोजी दोघे मंचर सोडून गेले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. महाराष्ट्रासह सुरत आणि उत्तर प्रदेशात त्यांनी चार वर्षे काढली. या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये काम करून उदरनिर्वाह केला. या दरम्यान ती सज्ञान झाली आणि मग दोघांनी कोर्ट मॅरेज करत निकाहनामाही केला. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी ते मंचरमध्ये परतले. आठवड्याभरानंतर कुटुंबियांना ती गावात आल्याचं समजलं, त्यांनी पोलिसांना याबाबत सांगितलं. मग पोलिसांनी तिला बोलावून घेतलं आणि वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठवलं, तिथं डॉक्टकरांनी काही प्रश्न विचारले असता तिच्या बोलण्यातून हा घडला प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी जावेदला अटक केली. सध्या पॉक्सो कायद्याअंतर्गत जावेद येरवडा तुरुंगात आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram