Murlidhar Mohol on Modi Cabinet : खासदार म्हणून दिल्लीत आलो... आता मंत्री झालो; मोहोळ भावूक!

Continues below advertisement

Khasdar Murlidhar Mohol : पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी (PM Modi Oath Taking Ceremony) लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान मिळाले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आज शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत 30 ते 40 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे. मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून सकाळी फोन आला. त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळाले. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला होता. नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे. मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आहेत. 

पुण्यात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मुरलीधर मोहोळ यांनी पुढे कॉलेज आणि कुस्तीसाठी कोल्हापूर गाठले. कोल्हापुरात तालीम केलेले मोहोळ 1993 च्या सुमाराला पुण्याच्या राजकीय आराखड्यात उतरले. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे. त्यामुळे कसलेला पैलवान ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी ठऱणारा आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram