Nashik : राज्यातील नगरपरिषद संवर्ग अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर
Nashik : राज्यातील नगरपरिषद संवर्ग अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर
नाशिकमध्ये नगरपरिषद सवर्ग अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत संपावर, पेन्शन योजना लागू नसल्यानं नव्यानं आलेली एकीकृत निवृत्ती योजना तात्काळ लागू करण्याची अधिकाऱ्यांची मागणी
गरपरिषद संवर्ग अधिकारी व कर्मचारी यांना DCPS, NPS अशी कोणत्याही प्रकारची पेन्शन योजना लागू नाही.तरी नव्याने आलेली युपीएस तात्काळ लागू करावी
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन दोन दोन महिने उशिरा होत असल्याने त्यांना वेतनासाठी अनुदान सहा महिने आगाऊ देण्यात यावी..अशी मागणी राज्यातील ३ हजार नगरपरिषद संवर्ग अधिकारी व ६० हजार नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी यांनी केली आहे.. मागील दोन दिवसांपासून राज्यातील नगरपरिषद संवर्ग अधिकारी व कर्मचारी हे संपावर आहे..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास खात्याची जबाबदारी असल्याने त्यांनी या मागणीचा विचार करून न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नगरपरिषद संवर्ग कर्मचारी संघटना यांनी केली आहे..