Mumbra : मुंब्रातील शिवाजीनगर भागात दोन घरांना भीषण आग, चार जण जखमी ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 May 2023 02:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्याजवळील मुंब्र्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या झगडे चाळीत आग लागल्याची घटना घडलीय.. चाळीतील दोन घरांना लागलेल्या आगीत एकूण ४ जण भाजले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. जखमींमध्ये एक पुरुष, एक महिला आणि २ लहान मुलांचाही समावेश आहे..आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचे प्रयत्न सुरू केले असून चाळीतील घरे खाली करण्यात आली आहेत..या ठिकाणाहून चाळीच्या वरून जाणारी हाय टेन्शन वायर पडल्याने सदर आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय..