Mumbai :Yashwant Jadhav यांच्या घरी २४ तासांनंतरही आयकर छापेमारी सुरूच, CRPFआणि पोलिसांचा बंदोबस्त
Continues below advertisement
मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी २४ तास उलटले तरी सुरूच आहे. आयकर खात्याच्या पथकानं काल सकाळी जाधव यांच्या घरी छापा टाकला. त्यानंतर दिवसभरात जाधव यांचे निकटवर्तीय आणि मुंबई महापालिकेतील कंत्राटदार यांच्या घरीही छापे टाकण्यात आले. आयकर विभागाचे अधिकारी जाधव यांच्या घरी ठाण मांडून बसले आहेत. मध्यरात्री जाधव यांना घरातून नेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानं शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. यावेळी शिवसैनिकांनी आयकर कारवाईविरोधात घोषणाबाजीही केली. जाधव यांच्या घरी काल सकाळपासूनच सीआरपीएफ आणि पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
Continues below advertisement