Mumbai : मुंबईतील पाणी कपात टळणार, पाणी पुरवठा करणाऱ्या 7  तलावांमध्ये ऑगस्टपर्यंत पुरेल इतका जलसाठा

Continues below advertisement

यावर्षी मुंबईतील पाणी कपात टळणार आहे.. याचं कारण म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7  तलावांमध्ये ऑगस्टपर्यंत पुरेल इतका जलसाठा उपलब्ध आहे.. मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून पाणीपुरवठा होतो.. यात एकूण 6 लाख 46 हजार 32 दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.. हा पाणीसाठा 48 टक्के असून ऑगस्टपर्यंत पुरणारा आहे.. दरवर्षी उन्हाळ्यात 10 ते 15 टक्के पाणीकपात होत असते मात्र यंदा ही पाणी कपात टळण्याचे संकेत पालिकेकडून देण्यात आलेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram