पंढरपूरला येणाऱ्या पादुकांसोबत 100 वारकऱ्यांना परवानगी द्या; मुंबई उच्च न्यायालयात याचिका,आज सुनावणी
Continues below advertisement
आषाढातली 'पंढरपूरची वारी' ही महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोना आणि टाळेबंदीचे संकट वारीवर आहे. मात्र तरीही किमान शंभर वारकऱ्यांसह माऊलींची पालखी पंढरपूरात घेऊन जाण्यास परवानगी द्या, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर मंगळवारी म्हणजेच, आज तातडीने सुनावणी पार पडणार आहे.
Continues below advertisement