Mumbai Traffic | दादरच्या Market मधील गर्दीने Senapati Bapat Marg वर वाहतूक कोंडी.

दादरच्या फूल मार्केटमध्ये उसळलेल्या गर्दीमुळे सेनापती बापट मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. उद्या गणपती बाप्पाचे आगमन होणार असल्याने दादरच्या फूल मार्केटमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग करण्यात आले आहे. यामध्ये अनेक पुलांचे ट्रक आणि भाज्यांच्या गाड्यांची अनधिकृत पार्किंग झाली आहे. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. ही संपूर्ण वाहतूक कोंडी सुटायला अजून दोन ते तीन तासांचा अवधी लागू शकतो अशी माहिती आहे. एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी या परिस्थितीचा आढावा घेतला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola