WEB EXCLUSIVE : कोकणातील लालपरी होणार 'इलेक्ट्रिक'; ST च्या ताफ्यात दाखल होणार 'इलेक्ट्रिक' बस
Continues below advertisement
'कोकण' आणि लालपरी यांचा अतूट असं नातं आहे. कोकणातील खेड्यापाड्यात असलेल्या गावांमध्ये प्रवासाचे साधन म्हणजे लालपरी. कोकणातील रस्त्यांवर धावणारी लाल परी आता इलेक्ट्रिक होणारे आहे दररोज वाढणारे इंधनाचे दर त्यातच होणारा वायू प्रदूषण रोखण्यासाठी परिवहन मंडळाने आपल्या ताब्यात लवकरच इलेक्ट्रिक एसटी बस घेण्याचा निर्णय घेतला आहे रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, महाड, मुरुड, श्रीवर्धन, माणगाव, कर्जत या आगारांमध्ये सुमारे ५७ इलेक्ट्रिक एसटी बसचा समावेश होणार आहे. रायगड जिल्ह्यातील खेड्यापाड्यांमध्ये दररोज सुमारे ४७९ सटी चा फेर्या होत असतात. यामुळे, दररोज सुमारे २४ हजार लिटर डिझेल या एसटीसाठी वापरले जात. परंतु, येत्या काही महिन्यांमध्ये एसटीच्या तासात दाखल होणाऱ्या इलेक्ट्रिक बसमुळे या इंधनाचे आणि खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे .
Continues below advertisement