Mumbai Thane Red Alert : पावसाचा कहर, मुंबई, ठाणे आणि नाशिकच्या घाटपट्ट्याला रेड अलर्ट
पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, पालघर, रत्नागिरी आणि नाशिकच्या घाट परिसरासाठीही हा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. घाटमाथ्याच्या परिसरामध्ये दोनशे मिलिमीटरपर्यंत पाऊस कोसळू शकतो, असे हवामान विभागाने सांगितले आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अठरा तारखेला पालघर आणि सिंधुदुर्ग वगळता संपूर्ण कोकणामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्यासाठी उत्तर कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगडसाठी रेड अलर्ट आहे. लोकलच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून, ती अत्यंत मंद गतीने सुरू आहे. मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहेत. चेंबूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून, रस्ते जलमय झाले आहेत. कोस्टल कॉलनी परिसरातही पाणी साचले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.