Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : ABP Majha

Continues below advertisement

पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, अनेक भागांत पाणी साचण्यास सुरुवात, नागपूर रत्नागिरीतही पावसाची दमदार हजेरी...मुंबईसह उपनगरात पावसाची प्रतीक्षा
((पुणे, रत्नागिरीत धो-धो))

मी पळणारा नाही, लढणारा माणूस, अमित शाहांच्या भेटीनंतर फडणवीसांचं विधान, 
सध्या काम सुरु ठेवण्याचा शाहांचा सल्ला, तर पराभवाचं खापर एकमेकांवर फोडू नका, मित्रपक्षांना आवाहन

मराठा समाजाला आपल्याच सरकारनं आरक्षण दिलं होतं, भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य, तर आरक्षणाच्या बदल्यात भाजपचे १०५ आमदार मराठ्यांनीच निवडून दिले, जरांगेंचा पलटवार...
((मराठा आरक्षणावरून दावे, प्रतिदावे))

संविधानाच्या मुद्द्यावरून महायुती आणि मविआमध्ये वाकयुद्ध सुरूच, संविधानासमोर नतमस्तक होणं हे मोदींचं ढोंग, संजय राऊतांची बोचरी टीका 
((नतमस्तक होणं मोदींचं ढोंग-राऊत))

नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेणार, देश-परदेशातील आठ हजार मान्यवरांना निमंत्रण

मंत्रिपद स्वीकारण्याचा खासदारांचा आग्रह श्रीकांत शिंदेंनी नाकारला...पक्षबांधणी आणि विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देणार असल्याचं केलं मत व्यक्त...

रामदास आठवलेंना यंदाही राज्यमंत्रिपदच मिळणार, कॅबिवेटचं आश्वासन मिळूनही सध्या राज्यमंत्रिपदावरच समाधान मानावं लागणार 
((आठवलेंना यंदाही राज्यमंत्रिपदच))

ठाकरे गटाचे दोन नवे खासदार संपर्कात, हे दोन खासदार आणखी चार खासदारांना घेऊन येणार, खासदार नरेश म्हस्के यांचा दावा, म्हस्केंचं वक्तव्य हास्यास्पद, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया 

रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांमधील वाद वाढला, दानवेंकडून सत्तारांना अफझलखानाची उपमा, शिवरायांनी अफझलखानाचं काय केलं होतं हे सर्वांना ठाऊक, दानवेंचं वक्तव्य
((अब्दुल सत्तारांना अफझलखानाची उपमा!))

काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधींची निवड, मल्लिकार्जून खरगेंनी मांडला प्रस्ताव

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपी जान्हवी मराठेला गोव्यातून अटक, तर होर्डिंग बनवणाऱ्या सागर कुंभारला देखील बेड्या 
(())

नीटच्या परीक्षेत कोणताही गोंधळ नाही, २३ लाखांपैकी केवळ १६०० जणांचा प्रश्न...केंद्रीय उच्चशिक्षण सचिवांचं स्पष्टीकरण...

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram