Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा, मुंबई सुपरफास्ट ABP Majha 18 June 2024
Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा, मुंबई सुपरफास्ट ABP Majha 18 June 2024
वसईत प्रियकराकडून प्रेयसीची भर रस्त्यात हत्या, हत्या होताना बघ्यांची गर्दी, वाचवायला कोणीच आलं नाही, डोक्यात लोखंडी पाना मारून केली हत्या, आरोपी ताब्यात.
वसईमध्ये भररस्त्यात तरूणीची हत्या झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश.
वसईमध्ये झालेली तरुणीची हत्या ही काळजाचा थरकाप करणारी, इतकी गंभीर आणि भयंकर घटना घडणं हे महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया.
वसईच्या घटनेवरून राज्यात मुली असुरक्षित असल्याचं पुन्हा सिद्ध, त्यामुळे नैतिकता बाळगून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी.
वसईमध्ये घडलेली घटना अतिशय हिंसक, याप्रकरणी आरोपीला कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया.
रिक्षा, टॅक्सी चालकांना ग्रॅच्युईटी देण्याचा मानस, ग्रॅच्युईटीसाठी वर्षाला ३०० रुपये भरावे लागणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा.
विधान परिषदेसाठीच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा. १२ जुलैला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी.