Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊत यांची किरीट सोमय्या यांना 'वॉर्निग', म्हणाले...
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबियासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरिट सोमय्या यांना इशारा दिला आहे. तुम्ही जे आरोप करताय ते सर्व बिनबुडाचे आहेत. त्यामुळे जे आरोप करताय ते सिद्ध करा, अन्यथा आरोप करू नका असं शिवसेना खासदार संजय राऊत यांचं म्हणणं आहे.