Sanjay Raut PC on | शिवरायांचा अपमान सहन करणार नाही : संजय राऊत | ABP Majha

Continues below advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलाय. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तान्हाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फ करुन चित्रफिती ट्विटरवर अपलोड करण्यात आल्यात. यात शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा चेहरा तर तान्हाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह यांचा चेहरा मॉर्फ करण्यात आलाय. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. शिवरायांचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा राऊतांनी दिलाय. तसंच शिवरायांचा वापर राजकारणासाठी होऊ नये असंही राऊत म्हणालेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram