Mumbai River Cleaning Drive : पावसाळा महिन्यानवर, नालेसफाई अपूर्णच, 'मिठी'ची स्वछताही धिम्या गतीने
Continues below advertisement
Mumbai River Cleaning Drive : पावसाळा महिन्यानवर, नालेसफाई अपूर्णच, 'मिठी'ची स्वछताही धिम्या गतीने
पावसाळा अवघ्या महिन्यावर आला असताना मुंबईत दोन महिन्यांत केवळ 57 टक्केच नालेसफाई झाली आहे. अजूनही अनेक नाले गाळाने भरलेले आहेत. त्यामुळे शिल्लक 43 टक्के काम एका महिन्यात पूर्ण करण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे. नालेसफाईत मिठी नदीच्या स्वच्छतेचे कामही धिम्या गतीने सुरू असून फक्त 43 टक्के काम पूर्ण झाले आहे. यंदा पावसाळय़ापूर्वी एकूण 9 लाख 82 हजार 426 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी आतापर्यंत 5 लाख 58 हजार 877 मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या 56.89 टक्के गाळ काढण्यात आला आहे. 31 मेपर्यंत हे टार्गेट पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.
Continues below advertisement