Mumbai Rain Update : कुर्ला-विद्याविहारमध्ये ट्रॅकवर पाणी, लोकल धीम्या गतीनं
मुंबईतील कुर्ला आणि विद्याविहार दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे प्रशासनाने पाणी काढण्यासाठी पंप लावले असले तरी पाण्याचा निचरा होत नाहीये. यामुळे लोकल ट्रेनची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. फास्ट ट्रॅकवरील गाड्या स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत. मुंबईकरांना सकाळी कामावर जाताना याचा त्रास सहन करावा लागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आज शहरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस होऊन आहे त्यामुळे इथे पूर्णपणे ट्रॅक जे आहे ते पाण्याखाली आलेला आहे. रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने प्रवाशांना अडचणी येत आहेत. एबीपी प्रतिनिधी नम्रता दुबे यांनी घटनास्थळावरून माहिती दिली.