Mumbai Rains | Sakinaka जंक्शन पाण्याखाली, Ghatkopar-Andheri Link Road ठप्प, दुचाकी वाहून गेल्या
मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी भरले आहे. साकीनाका जंक्शन पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरही वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्याला नदीचे स्वरूप आलेले दिसत आहे. साकीनाका ते घाटकोपर आणि घाटकोपर ते साकीनाका अशी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. अनेक वाहने, ज्यात दुचाकी आणि मोठ्या बसेसचा समावेश आहे, ती पाण्यात बंद पडलेल्या स्थितीत आहेत. काही दुचाकी वाहून गेल्याचेही दिसत आहे. आजूबाजूच्या दुकानांमध्येही पाणी शिरले आहे. या मार्गावर सुमारे चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे गेल्या काही तासांपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.