Mumbai Rains | हिंदमाता पुन्हा पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत, गुडघ्यावर पाणी

Continues below advertisement
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दादर परिसरातील हिंदमाता भागात पुन्हा एकदा पाणी साचले आहे. कालही येथे पाणी भरले होते. हिंदमाता हा सखल भाग असल्याने येथे लगेच पाणी जमा होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता परिसर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी वाहने हिंदमाता फ्लायओव्हरवरून लालबाग किंवा मुंबईच्या दिशेने वळवली आहेत. पालिका प्रशासनाने पाण्याचा निचरा करण्यासाठी मॅनहोल्स उघडले आहेत आणि पंपिंग हाऊस देखील सुरू आहेत. सेंट जॉर्ज येथील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून ते समुद्रात सोडले जात आहे. सकाळपासूनच या भागात गुडघ्यावर पाणी आहे आणि पाण्याचा निचरा होत नाहीये. पावसाचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. पुढील काही तास अशीच परिस्थिती राहिल्यास पाणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola