Mumbai Rain Special Report : मुंबईत आजही धोधो! हिंदमाता ते ठाणे..कुठे काय परिस्थिती?

देशभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्याची राजधानी मुंबई आणि ठाणे शहरातही पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळपासून मुंबई, ठाणे आणि आसपासच्या उपनगरात पाऊस सुरूच होता. यामुळे नागरिकांचा खोळंबा झाला. रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली. मुंबईतील हिंदमाता, वडाळा स्टेशन, किंग सर्कल आणि दादर स्टेशन परिसरात गुडघाभर ते कमरेइतकं पाणी साचलं होतं. वडाळा स्टेशनवर रेल्वे ट्रॅक दोन फूट पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती. बीकेसी मेट्रो स्थानकातही पाण्याची गळती पाहायला मिळाली. मुसळधार पावसामुळे भांडुप लेक रोड परिसरात झाड कोसळून दहा ते बारा रिक्षा दबल्या गेल्या. मीरा भाईंदरमध्येही झाड कोसळून रस्ता बंद झाला होता. मुंबईतून वाहणाऱ्या मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे कुर्ला आणि बांद्रे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. ठाणे शहरातही पावसाचा जोर कायम असून, सीएसएमटीहून ठाण्याकडे येणाऱ्या सर्व ट्रेन्स रद्द करण्यात आल्या होत्या. ठाणे महापालिका क्षेत्रातील डायघर भागात घरांमध्ये पाणी शिरले. पुराच्या पाण्यासोबत काही सापही दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या परिस्थितीत, 'ज्याकरिते आप लोक जोत न घड में है, घर खाली कर दीजा' असे आवाहन करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूममधून महापालिका अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola