Mumbai Rains : मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस, दादार भागात काय परिस्थिती? ABP MAJHA

मुंबई आणि उपनगरांत पावसाची संततधार सुरू आहे. अंधेरी, घाटकोपर, वांद्रे, गोरेगाव या भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. सकाळी अकरा वाजून नऊ मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. दादर चौपाटी आणि मरीन ड्राइव्ह परिसरात समुद्र खवळलेला असून, चार पूर्णांक चाळीस मीटरच्या उंच लाटा उसळत आहेत. यामुळे चौपाटी परिसरातील दुकानांपर्यंत लाटा धडकत आहेत. पोलिसांनी "चौपाटी परिसरात कोणी आतमध्ये जाऊ नये" असे आवाहन केले आहे. दादरमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी, पश्चिम उपनगरात, खासकरून अंधेरी ते बोरिवलीपर्यंत, पावसाचा जोर कायम आहे. तसेच पूर्व उपनगरातील घाटकोपर आणि भांडुपमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील तीन ते चार तासांत मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola