Mumbai Rain Update | पुढील 3 तासांत मुंबईसह रायगड, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Continues below advertisement

रत्नागिरी :  कोकणात (Konkan Rain) आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.  रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट (Red Alert)  तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असल्याने अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत. रत्नागिरीत तर 205  मिमीहून अधिक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.  उद्या देखील कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कोकणात  अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत. रायगडच्या समुद्राला उधाण आले आहे. दुपारनंतर समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होताच. काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर समुद्र आणखी खवळेल असा अंदाजही हवानाम खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान, मच्छीमारांना अजिबात समुद्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram