Mumbai Rain : मुंबईत हलक्या सरी; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Continues below advertisement

Mumbai Rain :  मुंबईत हलक्या सरी;  पावसाचा जोर वाढण्याची शक्यता 

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सकाळी  हजेरी लावली आहे.  मुंबई शहर आणि उपनगरात (Mumbai Rain Update)  ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने उसंत घेतली होती. शुक्रवारी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी होत्या.  मात्र शनिवारी पहाटेपासून (Heavy Rain) चांगलाच  जोर धरला आहे.  मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अंधेरी, विरार, भाईंदर, ठाणे, मुलुंड,  कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबईमध्ये सगळीकडेच मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक दिवासांच्या विश्रांतीनंतर पाऊसाला सुरवात  झाली आहे. या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. लोकलसेवा उशिराने सुरू आहे. 

रेल्वे सेवेचाही वेगही मंदावला 

त्यामुळे शनिवारची सकाळ कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कसरतीची ठरणार, हे स्पष्ट झाले होते. आज सकाळ उजाडल्यानंतरही मुंबई आणि ठाण्यातील पावसाचा (Thane Rain) जोर कायम आहे.  मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे.  सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होताना दिसत आहे. याशिवाय, मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेचाही वेगही मंदावला आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram