Mumbai Train Accident : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा प्रवाशांना फटका, 2 प्रवाशांचा मृत्यू; जबाबदार कोण?
Continues below advertisement
मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्याने दोन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी रेल्वे युनियनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एका प्रवाशाने संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'दोन दोन लाख रुपये तुम्ही पगार घेता... आमच्या दोन प्रवाशांचे बळी गेलेले आहेत... या Union वाल्यांना suspend करणं गरजेचं आहे'. मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सीएसएमटी स्थानकावर सुमारे तासभर लोकल सेवा ठप्प झाली होती. सेवा पुन्हा सुरू झाल्यावर, रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना लोकलने धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. आता या युनियनवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement