Mumbai Pune Traffic : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहतूक कोंडी, 2-3 किलोमीटर वाहनांच्या रांगा
Continues below advertisement
मुंबईमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनवर बंदी घातल्यानंतर आता मुंबईकरांनी सेलिब्रेशनसाठी मुंबईबाहेरचा रस्ता धरलाय. मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येतायत, पुण्याकडे जाणाऱ्या बाजूस सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहनांची रांग लागली असून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटात धिम्या गतीने वाहतुक सुरू आहे. अमृतांजन पुलापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहनांची रांग लागलेय. शुक्रवार सायंकाळपासून पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी होताना दिसतेय.
Continues below advertisement