Mumbai Pune Expresswayवर अपघातग्रस्त बस आणि रुग्णवाहिकेला ट्रकची धडक, मोठी दुर्घटना टळली

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मोठी दुर्घटना टळली. ट्रकनं अपघातग्रस्त खासगी बस आणि बचावकार्यालयातील रुग्णवाहिकेला धडक दिली. पण सुदैवानं बसमधील प्रवासी सुरक्षितस्थळी असल्यानं जीवितहानी टळली. पहाटे सव्वा सहा वाजता खालापूर टोलनाक्याजवळ या बसनं एका वाहनाला मागून धडक दिली होती. त्यात काही प्रवासी जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका आली होती. हे बचावकार्य सुरु असताना मागून आलेल्या ट्रकनं अपघातग्रस्त बस आणि रुग्णवाहिकेला धडक दिली. ट्रकचालक झोपेत असल्यानं दुर्घटना घडल्याची माहिती मिळतेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola