Mumbai Hostage Crisis: स्टुडिओतील थरार, मुलांना वाचवताना पोलिसांच्या कारवाईत 75 वर्षीय आजी जखमी
Continues below advertisement
मुंबईतील पवई (Powai) येथील एका स्टुडिओमध्ये घडलेल्या ओलिसनाट्यात (Hostage Crisis) एका 75 वर्षीय आजी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळ रोहीत आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने एका स्टुडिओमध्ये सुमारे १७ मुलांना ओलिस ठेवले होते. 'पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो दरवाजा माझ्यावर पडला आणि मी जखमी झाले,' असे ७५ वर्षीय पीडित मंगला पाटणकर (Mangal Patankar) यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणकर आपल्या नातीसोबत स्टुडिओमध्ये आल्या होत्या. बाहेर उकाडा असल्याने त्या स्टुडिओमध्ये बसल्या होत्या, त्याचवेळी हे ओलिसनाट्य घडले आणि त्या अडकल्या. पोलिसांनी मुलांना वाचवण्यासाठी स्टुडिओचा काचेचा दरवाजा तोडला, जो थेट पाटणकर यांच्या डोक्याला लागला आणि त्या जखमी झाल्या. या थरारक घटनेनंतर सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, आरोपी रोहीत आर्य पोलीस कारवाईत मारला गेला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement