Manoj Jarange Patil : 'दहा तारखेला हजर रहा!', मनोज जरांगे पाटलांना Mumbai Police चे समन्स

Continues below advertisement
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) समन्स बजावले आहे. परवानगीशिवाय आझाद मैदानात (Azad Maidan) आंदोलन केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना १० तारखेला आझाद मैदान पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. २ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण केले होते. मात्र, या आंदोलनाला परवानगी नसतानाही ते आयोजित केल्यामुळे त्यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आता जरांगे पाटील यांच्यासह पांडुरंग तारक, गंगाधर कालकुटे, चंद्रकांत भोसले, विरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत यांनाही पोलिसांनी समन्स बजावले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola