Underworld Crackdown: दाऊदचं ड्रग रॅकेट उद्ध्वस्त, दुबईतून सूत्रधाराला अटक
Continues below advertisement
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि कुख्यात ड्रग माफिया सलीम डोला (Salim Dolla) यांच्याशी संबंधित मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 'अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित दोनशे छप्पन्न कोटींच्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केलाय'. या प्रकरणात, सलीम डोलाचा साथीदार आणि दुबईस्थित हँडलर मोहम्मद सलीम सुहेल शेख (Mohammad Salim Suhel Shaikh) याला दुबईतून अटक करून भारतात आणण्यात आले आहे. या रॅकेटचे धागेदोरे सांगली जिल्ह्यातील मेफेड्रोन (Mephedrone) ड्रग फॅक्टरीशी जोडलेले असून त्याचे जाळे दुबईपर्यंत पसरल्याचे तपासात उघड झाले आहे. मुंबई पोलिसांनी या कारवाईत आतापर्यंत एकूण १५ आरोपींना अटक केली असून, दोनशे छप्पन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement