Mumbai Police Bharti : मुंबईतील मुसळधार पावसाचा पोलीस भरतीला फटका; उमेदवार ताटकळे
Mumbai Police Bharti : मुंबईतील मुसळधार पावसाचा पोलीस भरतीला फटका; उमेदवार ताटकळे
पोलीस भरतीसाठी मुंबईत हजारो च्या संख्येने तरुण दाखल झाले आहेत. घाटकोपर येथे लोहमार्ग पोलिसांच्या मैदानात या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. मात्र मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना भर पावसात तात्काळत या उमेदवारांना उभे राहावे लागत आहे. कोसळणाऱ्या पावसात तासनतास उपाशी पोटी हे तरुण आपल्या मैदानी चाचणी ची येण्याची वाट पाहत आहेत. या मुळे त्यांच्या मैदानी कामगीरी वर ही मोठा परिणाम होत आहे. अश्या पावसात योग्य सुविधा करून देण्याची किंवा ही चाचणी पुढे ढकलण्याची मागणी या तरुणांनी केली आहे. इथला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी…