Maharashtra MLA Cheated : 100 कोटींच्या बदल्यात मंत्रिपदाचं आमिष, आमदारांना लुटणारी टोळी ताब्यात

Continues below advertisement

राज्यात मंत्रमंडळ कधी अस्तित्वात येणार असा जनतेला प्रश्न आहेच पण मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या काही आमदारांनाही याची धाकधूक आहे.. आणि याच परिस्थितीचा फायदा घेत आमदारांना लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीनं 3 आमदारांना फसवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. दिल्लीतून आल्याची बतावणी करत या आरोपींनी कॅबिनेट मंत्रिपद हवं असल्यास 100 कोटी रुपये लागतील, त्यातले 20 टक्के आत्ता आणि उर्वरित शपथविधीनंतर अशी अट घातली. नरिमन पॉईंटच्या ओबेरॉय हॉटेलवर या आरोपींनी आमदारांची भेटही घेतली मात्र याची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे. एका आमदाराच्या पीएनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केलेय.  कोल्हापूरचा रियाज शेख, ठाण्याचे योगेश कुलकर्णी आणि सागर संगवई, आणि मुंबईच्या नागपाड्याला राहणारा जाफर अहमद अशी या चार आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी एका आमदाराच्या पीएवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram