Pigeon Feeding Ban | मुंबईत कबुतरांना दाणे, जेलमध्ये जाणे! Special Report
मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये कबूतरांची वाढती संख्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. कबूतरांची पिसं आणि विष्ठा मानवी आरोग्यासाठी घातक असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई उच्च न्यायालयाने कबूतरांना खाद्य घालण्यावर बंदी घातली आहे. बंदी असतानाही कबूतरांना दाणे टाकणाऱ्यांवर आता थेट एफआयआर दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. "कबूतरांना खायला द्याल तर जेलमध्ये जाल," असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. बीएनएस कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केला जाईल. दादरच्या कबूतरखान्यात बंदी असतानाही नागरिक दाणे घालत असल्याने कोर्टाने महानगरपालिकेलाही फटकारले आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असतानाही पालिका काय करत आहे, असा सवाल कोर्टाने उपस्थित केला. कबूतरांमुळे होणाऱ्या त्रासाची पालिकेने काळजी घ्यावी आणि आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असे निर्देश दिले आहेत. प्राणीमित्रांनी दिवसातून दोनदा दाणे घालण्याची परवानगी मागितली होती, परंतु कोर्टाने मानवी आरोग्याला प्राधान्य दिले.