Coronavirus | कोणत्याही रुग्णाला तपासणीशिवाय परत पाठवू नका, सरकारचा रुग्णालयांना आदेश
Continues below advertisement
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या टप्प्यावर पोहोचली आहे. त्यातच राज्य सरकारने कोविड19 आणि नॉनकोविड रुग्णांसदर्भात सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयांसाठी आदेश जारी केला आहे. रुग्णालयात आलेल्या कोणत्याही कोविड 19 किंवा नॉन कोविड रुग्णाला तपासणीशिवाय परत पाठवू नये. तसंच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या पार्थिवावर 12 तासात अंत्यसंस्कार करा, असं सरकारने आदेशात म्हटलं आहे. याशिवाय आणखी महत्त्वाचे निर्देशही दिले आहे. 2 मे सकाळी 10 वाजल्यापासून या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे.
Continues below advertisement