Nawab Malik on Rajnath Singh | सरकारला सर्कस बोलणार्या राजनाथ सिंह यांचे 'अनुभवाचे बोल' : नवाब मलिक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jun 2020 02:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राजनाथ सिंह यांनी केलेल्या टीकेला राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. "लोकशाही मार्गाने चालणार्या सरकारला सर्कस बोलणार्या राजनाथ सिंह यांचे 'अनुभवाचे बोल' आहेत, असं नवाब मलिक म्हणाले. "महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गाने सरकारचे काम सुरु आहे. कोरोना काळात सरकारने केलेल्या कामाचे ICMR ने मुंबई मॉडेलची स्तुती केली आहे. मात्र असे असताना केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह रिंग मास्टरच्या चाबूकने चालवले जाणारे सरकार असे वक्तव्य करत आहेत, असंही मलिक म्हणाले.