Nanar Project Inquiry | नाणार जमीन व्यवहारांची चौकशी करा; विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश 

Continues below advertisement

मुंबई : रद्द झालेल्या नाणार प्रकल्पाच्या परिसरातील जमीन खरेदी-विक्रींच्या व्यवहारांची चौकशी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यातर्फे करण्यात यावी. भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनी परत करण्यासंदर्भात प्राधान्याने विचार व्हावा. प्रकल्पाचा सुगावा लागताच घाऊक पद्धतीने जमिनी विकत घेणारे परप्रांतीय व्यापाऱ्यांचे रॅकेट त्यावेळी कार्यरत होते किंवा कसे, याचाही तपास करण्यात यावा. याबाबत तातडीने कार्यवाही करुन एक महिन्याच्या आत कृती अहवाल सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीतर्फे मिळालेल्या निवेदना संदर्भात आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्‍तरीय बैठक घेण्यात आली. त्यावेळी पटोले यांनी आदेश दिले. या बैठकीत समितीतर्फे भावकीच्या सामुहिक मालकीच्या जमिनीची परस्पर विक्री होणे, बेपत्ता व मृत व्यक्तींच्या नावे बनावट आधार कार्ड काढून जमीनी विक्रीचे व्यवहार करणे किंवा ठराविक कालावधीत अचानक खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार होणे असे अनेक मुद्दे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले.


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram