Mumbai Monorail Breakdown: तिसऱ्यांदा ठप्प, प्रवाशांचे हाल, तांत्रिक बिघाडामुळे सेवा विस्कळीत

मुंबईत मोनोरेल पुन्हा एकदा बंद पडली आहे. सकाळी पावणे आठच्या सुमारास वडाळा दरम्यान तांत्रिक कारणामुळे मोनोरेल ठप्प झाली. बंद पडलेल्या मोनोरेलमध्ये सतरा प्रवासी होते. त्यांना दुसऱ्या मोनोरेलमध्ये सुरक्षितपणे हलवण्यात आले. फायर ब्रिगेडच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सध्या मोनोरेलच्या एकाच ट्रॅकवर दोन मोनोरेल आहेत, कपलिंग करून बंद पडलेली मोनोरेल कारशेडमध्ये नेली जात आहे. महिन्याभरात मोनोरेल बंद पडण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी १९ ऑगस्टला आणि त्यानंतर आठवड्याभरात पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल बंद पडली होती. नेमके काय तांत्रिक कारण आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. एकाच मार्गावरून मोनोरेलची ये-जा सुरू असल्याने प्रवाशांना उशीर होत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी, कार्यालये सुरू असताना मोनोरेल बंद पडल्याने मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे. सार्वजनिक वाहतूक मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola