Mumbai Monorail stranded | भक्ती पार्क-म्हैसूर कॉलनी दरम्यान Monorail मध्ये प्रवासी अडकले, बचावकार्य सुरू

मोनोरेलच्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनी दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल थांबली. सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली. तासाभराहून अधिक काळ प्रवासी मोनोरेलमध्ये अडकले आहेत. अग्निशामक यंत्रणा आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. क्रेनच्या मदतीने प्रवाशांना रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोनोरेलचे इमर्जन्सी डोअर अद्याप उघडलेले नाहीत. प्रवासी व्हेंटिलेशनसाठी गॅपमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. चार डबे पूर्ण भरलेली मोनोरेल प्रचंड गर्दीने भरलेली होती. आतमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही प्रवासी काचा वाचवताना दिसत आहेत. पोलीस प्रशासनाकडून प्रवाशांना "संयम आणि थांबा आम्ही तुम्हाला रेस्क्यू करण्यासाठी पोहोचलेले आहेत" असे सांगितले जात आहे. एकावेळी चार ते पाच प्रवाशांना क्रेनमध्ये घेता येणार आहे. मुंबईत सकाळपासून पाऊस सुरू असल्याने वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. मोनोरेल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. एमएमआरसीएलने एका बाजूची लाईन सुरू ठेवल्याचे म्हटले आहे, पण गेल्या वीस मिनिटांपासून रुळावरून कोणतीही गाडी धावलेली नाही. यापूर्वी दोन रेल्वे आमनेसामने आल्या होत्या, त्यापैकी एक रेल्वे मागे घेण्यात आली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola