Mumbai Molkarin Gang : घरकाम करताना लाखोंची चोरी

मुंबईकरांनो घरकामासाठी नवीन मोलकरीन ठेवण्याच्या विचारात असाल तर सावधान. कारण आता नवीन मोलकरणी करताहेत घरात चोऱ्या... घरकामाच्या नावाने घरात प्रवेश करून संधी मिळताच करत आहेत चोऱ्या... नुकत्याच झालेल्या एक प्रकरणात मुंबईमधील बांद्रा पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे. घरकाम करण्याच्या नावाखाली हे महिला घरात शिरतात आणि मग विश्वास संपादन करून चोरी करतात अशी हि घटना समोर आली आहे. यांचा मुख्य टार्गेट माझे  मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांच्या घरी काम करायचं आणि मग चोरी करायची. त्या महिलांनी  बांद्रामधील मधील एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरी चोरी केल्यानंतर बांद्रा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करत या महिलांचा शोध सुरू केला

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola