MNS Adhiveshan | अमित ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड | ABP Majha
ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य सक्रीय राजकारणात सहभागी झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग झालं आहे. अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांच्या लॉन्चिंगची घोषणा केली. यावेळी अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे, पत्नी मिताली ठाकरे, बहिण उर्वशी, आजी कुंदाताई ठाकरे उपस्थित होत्या. परंतु राज ठाकरे मात्र मंचावर उपस्थित नव्हते. ते एका खोलीत बसून हा प्रसंग पाहत होते.