वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांची राज्यपालांशी चर्चा, मेडिकलच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची तयारी

Continues below advertisement
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 2020 परीक्षा कोविड-19 च्या लॉकडाऊनमुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलगुरू अमित देशमुख यांनी आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवन भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला आहे. याबाबत आपण राज्यपालांना अवगत केले आहे, असे अमित देशमुख यांनी सांगितले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram