Mumbai Metro : मुंबई मेट्रोने मालमत्ता कर थकवला, 21 दिवसांमध्ये कर भरण्याचे निर्देश : ABP Majha
मुंबई मेट्रो 1 ने 2013 पासून कोट्यवधींचा मालमत्ता कर थकवला आहे.. त्यामुळे मुंबई महापालिकेने आठ मेट्रो स्थानकांना नोटीस पाठवली आहे... थकीत कराची ही रक्कम 21 दिवसांमध्ये भरण्याचे निर्देश पालिकेकडून देण्यात आली आहे... थकबाकीची रक्कम जमा केली नाही तर मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तर, या करवाईनंतरही कर भरला नाही तर मलनिस्सारण वाहिनीही खंडित केली जाणार आहे...यामध्ये मेट्रोच्या आठ स्थानकांचा समावेश आहे