Mumbai Metro : मेट्रो वनच्या अधिग्रहणाचा अहवाल सार्वजनिक नाही
Mumbai Metro : मेट्रो वनच्या अधिग्रहणाचा अहवाल सार्वजनिक नाही
वर्सोवा मार्गावर धावणारी मुंबई मेट्रो अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरू केलीये. माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अहवालाच्या आधारे हस्तांतरण सुरू आहे. मात्र त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यास एमएमआरडीएने नकार दिलाय...जॉनी जोसेफ समितीने सदर प्रकल्पाची किंमत निश्चित करत रिलायन्सच्या स्टेकची किंमत चार हजार कोटी निश्चित केलीये.... याबाबतची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराखाली मागितली होती. मात्र ही माहिती व्यावसायिक स्वरूपाची असल्याने उपलब्ध करता येणार नसल्याचे एमएमआरडीएचे उपवाहतूक अभियंता गजानन ससाणेंनी म्हटलंय.... त्यामुळे मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरही अहवाल सार्वजनिक केला जात नसल्याने सरकारचे सोळाशे कोटींचे नुकसान होत असल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलाय...