Mumbai Metro 3 | PM Modi उद्या करणार अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण, मुंबईकरांना मिळणार वेगवान प्रवास
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबई मेट्रो तीनच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. वरळी नाका ते कफ परेड हा भुयारी मेट्रोचा टप्पा मुंबईकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या टप्प्यामुळे आरजेवीएलआर ते कफ परेड हा प्रवास अवघ्या तासाभरात पूर्ण करता येणार आहे. मेट्रो तीन मार्गावर गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटांनी एक मेट्रो धावणार आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील कफ परेड, नरिमन पॉइंट, फोर्ट आदी स्थानकांवरून थेट मुंबई उपनगरातील बीकेसी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही टर्मिनल्सना वेगात पोहोचता येईल. काळबादेवी स्टेशनसारखी अनेक स्थानके जमिनीखाली पाच मजले खोल बांधण्यात आली आहेत. या मेट्रोमध्ये तिकीट घर, आपत्कालीन विद्युत पुरवठा बंद करण्याची यंत्रणा आणि अलार्म सिस्टीमसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. दक्षिण मुंबईकरांसाठी ही सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर प्रवासाची व्यवस्था ठरणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement