Mumbai Local Mega Block : दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
उपनगरीय रेल्वे मार्गावरील दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी 5 फेब्रुवारीला मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा-मुलुंड दरम्यानच्या अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गानं वळवण्यात येतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरानं पोहोचतील.